परंतु तुम्ही कधी निरीक्षण केलंय का की पेपरमध्ये खालच्या बाजूला वेगवेगळ्या रंगांचे ठिपके असतात.
पेपरच्या खालच्या बाजूस असणाऱ्या प्रत्येक ठिपक्याचा अर्थ वेगळा आहे.
आपल्या सगळ्यांना तीन महत्त्वाचे रंग माहिती आहेत. लाल, पिवळा आणि निळा. या रंगाना मूळ रंग (बेसिक कलर) देखील म्हटलं जातं.
निळा cyan (C) , गुलाबी magenta (M), पिवळा yellow (Y), आणि काळा black या रंगाच्या समुहाला CMYK म्हणतात.
CMYK ला रजिस्ट्रेशन मार्क देखील म्हटलं जातं.
CMYK तंत्रज्ञानानं वर्तमानपत्र छापण्याचा ट्रेंड खूप जुना आहे. ही एक अतिशय स्वस्त पद्धत आहे.
जेव्हा वृत्तपत्राची छपाई सुरु असते. तेव्हा प्रिन्ट काढणारा व्यक्ती हे डॉट पाहतो. जर हे डॉट ठीक येत नसतील तर वृत्तपत्रात छापले जाणारे फोटो देखील खराब येतात.
त्यामुळे छपाई करणारा व्यक्ती वृत्तपत्राच्या तळाशी असलेले हे चार डॉट पाहत असतो.
थोडक्यात वृत्तपत्रावरील हे ठिपके वृत्तपत्रावर योग्य कलर पॅटर्न बनवण्यासाठी डॉट मार्कर म्हणून काम करतात.
अनेक वृत्तपत्रात या CMYK रंगाच्या शेड देखील वापरलेल्या असतात.
मात्र, ज्या वृत्तपत्रामधील हे डॉट ठीक आलेले नसतात. त्या वृत्तपत्राची छपाई ठीक झाली नाही. असं समजलं जातं.