20, 24 की 28? कोणत्या टेम्परेचरवर AC लावल्याने वाचते वीज?
भारतातील अनेक लोक घरांमध्ये आणि ऑफिसमध्ये एसी वापरतात. मात्र जास्तीत जास्त लोकांना एसी चालवण्याची योग्य माहिती नसते.
आज आम्ही तुम्हाला याविषयी महत्त्वाची माहिती देणार आहोत. ज्यामुळे वीजेची बचत होऊ शकते.
जास्तीत जास्त लोकांना सवय असते की, एसी ऑन करताच ती 18 किंवा 21 डिग्रीवर चालवतात. मात्र हे बेस्ट टेम्परेचर नाही.
तुम्हाला वीजेची बचत करायची असेल तर ही योग्य पद्धत नाही. कारण सर्वांनाच माहिती आहे की, एसी चालवल्यावर वीज बिल जास्त येतं.
पण वीज कमी लागावी यासाठी योग्य टेम्परेचर कोणतं? याविषयी आपण जाणून घेऊया.
सरकारने 2020 पासूनच एसीसाठी डिफॉल्ट सेटिंग 24 डिग्री केली आहे.
एक्सपर्टही मानतात की, एसी चालवण्यासाठी योग्य टेम्परेचर हेच आहे.
मानवी शरीरासाठी देखील 24 हे तापमान योग्य मानलं जातं.
अनेक संशोधनांमध्येही समोर आलंय की, प्रत्येक डिग्रीवर वीजेची 6 टक्के बचत होते.