नेल कटरमधील 2 सुऱ्यांचं काम काय?
नखे लांब असतील तर त्यात घाण साचते. त्यामुळे ते कापणे किंवा साफ करणे गरजेचं आहे. नख कापण्यासाठी नेलकटरचा वापर केला जातो.
पण या नेलकटरमध्ये तुम्ही दोन चाकू पाहिले असतील, ते नक्की कशासाठी असतात किंवा त्याचं खरं काम माहितीय का?
वास्तविक, नेल कटरचे काम फक्त नखे कापण्यासाठीच असतो. त्यामुळे नख कापण्याशिवाय त्याचा आणखी वापर होत नाही.
अशा परिस्थितीत त्याची उपयुक्तता वाढवण्यासाठी त्यात २ चाकूसारखे उपकरण जोडण्यात आले. यामुळे नखे कापण्याशिवाय इतर अनेक कामांमध्ये याचा वापर करता येतो.
आता नेलकटरमध्ये असलेल्या या दोन धारधार गोष्टींचा वापर कशासाठी करता येतो? चला पाहू
नेलकटरला दोन सुऱ्या जोडल्यानंतर नेल कटरची उपयुक्तता एवढी वाढली आहे की, आता तुम्ही कोणत्याही सहलीला सोबत घेऊन जाऊ शकता.
तुम्ही ते अनेक कारणांसाठी वापरू शकता. नेल कटरवर एक लहान वक्र आकाराचा चाकू असतो, त्याच्या मदतीने तुम्ही बाटलीचे झाकण उघडू शकता.
सहलीवर असाल तर छोट्या चाकूच्या मदतीने तुम्ही लिंबू, संत्री किंवा अशी कोणतीही वस्तू सहज कापता येईल.
काही लोक या चाकूंच्या धारदार टोकांचा वापर करून नखांची घाण साफ करतात. पण असे करणे योग्य नाही.