साडेसाती मागं लागली असेल तर करा हे उपाय, शनिदेव होतील प्रसन्न

शनि ग्रहाला न्यायदेवता किंवा कर्मफलदाता मानलं जातं.

शनिदेव दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतात.

शनीची राशी बदलताच काही राशींवर साडेसातीचा प्रभाव सुरू होतो.

सध्या कुंभ, मीन आणि मकर राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे.

शनिदेवाची साडेसाती तीन चरणांची असते.

सध्या मीन राशीच्या लोकांवर पहिलं चरण सुरू आहे.

कुंभ राशीवर दुसरं तर मकर राशीवर तिसरं चरण सुरू आहे.

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी शनि मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.

पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

शंभू महादेवाची पूजा केल्यानंही शनिदेवही प्रसन्न होतात.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही