सॉफ्ट आणि चमकदार त्वचेसाठी रोज चेहऱ्यावर काय लावायचं?
सॉफ्ट आणि चमकदार त्वचा सर्वांनाच हवी असते. यासाठी अनेकजण दररोज चेहऱ्यावर विविध प्रॉडक्ट्स लावतात.
परंतु बऱ्याचदा चेहऱ्यावर या प्रॉडक्ट्समुळे त्वचेवर मुरूम येतात.
तेव्हा दररोज त्वचेवर काय लावायचं याविषयी जाणून घेऊयात.
दह्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. दही त्वचेला मॉइश्चराईज करते.
नारळाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज केल्याने डार्क स्पॉट्स कमी होतात. तेव्हा दररोज 4 ते 5 थेंब तेलाने मसाज करा.
एलोवेरा जेल त्वचेला मॉइश्चराईज करते. त्यात हायड्रेटिंग गुण असतात. तुम्ही याने चेहऱ्याला मसाज करू शकता.
मधात अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. तेव्हा याने चेहऱ्यावर काहीवेळ मसाज करा आणि नंतर धुवून टाका.
चेहऱ्यावर हळद आणि बेसन मिक्स करून लावू शकता.
हळद आणि बेसनामुळे त्वचेतील डेड सेल्स निघून जातात आणि त्वचा चमकदार बनते.
सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा कोणत्याही गोष्टीचा त्वचेवर अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.