अपयश आल्यावर नेमकं काय करावं?
परीक्षा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा हिस्सा आहे.
अपयश आल्यावर अनेकदा विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या करतात.
अशा परिस्थितीत डॉ. सिफाका जफरीन यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती दिली.
त्या म्हणाल्या, आपण सकारात्मक विचार ठेवावा.
स्वत:ला नेहमी मजबूत ठेवा.
आपल्या अपयशाला अनुभवाच्या दृष्टीने पाहा.
पहिल्यांदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला तुमच्यासारखा अनुभव नसतो.
अपयश आल्यामुळे तुम्हाला तुमच्यात नेमकं काय कमी आहे, हे जाणवतं.
सकारात्मक मानसिकतेसह परीक्षा द्यायला हवी.