WhatsApp वरील 'हा' निळा गोळा नक्की काय काम करतो?

व्हॉट्सॲपवर तुम्ही एक रंगीत गोळा पाहिला असणार, खरंतर हे व्हॉट्सॲपचं नवीन फीचर आहे. अनेकांना याबद्दल काहीच माहिती नाही.

हा रंगीत गोळा नक्की काय कामाचा? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

हा गोळा आपलं बहुतांश काम हलकं किंवा सोपं करु शकतं. पण अनेकांना तो वापरायचं कसं हे माहित नाही.

हा रंगीत गोळा म्हणजे ‘मेटा एआय’ आहे. हे सामान्य वैशिष्ट्य नसून AI च्या मदतीने चालवलं जाणारं चॅटबॉट आहे. 

हा चॅटबॉट अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो, माहिती देऊ शकतो आणि फोटो ही देऊ शकतो.

हे फीचर व्हॉट्सॲपच्या मूळ कंपनी मेटाने तयार केले असून ते युजरच्या मदतीसाठी तयार करण्यात आले आहे

तो अनेक भाषा समजू शकतो आणि संवाद साधू शकतो. ‘मेटा एआय’चा वापर व्हॉट्सॲपवर चॅटबॉट म्हणून केला जात आहे.

हे फीचर केवळ व्हॉट्सॲपवरच नाही, तर इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही हे फीचर आणण्यात आले आहे.