आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावं?

उन्हाळा चालू आहे. या मोसमात आईस्क्रीमची चव सर्वांनाच आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा हा पदार्थ आहे.

लोकांचा असा विश्वास आहे की या ऋतूत आईस्क्रीम खाल्ल्याने शरीर थंड राहते आणि उष्णतेपासून आराम मिळतो.

पण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तहान का लागते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

शिवाय आइस्क्रीम खाल्ल्यानंतर तहान का लागते आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी कधी प्यावे हे अनेकांना माहित नसते.

आईस्क्रीम साखर आणि सोडियमपासून बनते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्यामुळे ते रक्तात मिसळल्यानंतर तहान लागते

आपल्या मेंदूला ही संपूर्ण प्रक्रिया समजते. यानंतर आपल्या शरीराला पाण्याची गरज असल्याचे संकेत पाठवण्यास सुरुवात होते.

काही लोक आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच तहान लागल्यावर पाणी पितात. 

पण ताबडतोब पाणी प्यायल्याने घसा खवखवणे आणि सर्दी तसेच दातांचा त्रास होऊ शकतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. जेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाता तेव्हा 15 मिनिटांनीच पाणी प्या.