शारदीय नवरात्रारंभ कधी? या तिथीला होणार घटस्थापना
यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 पासून होत आह
े.
हा उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि 9 दिवस असतो.
शारदीय नवरात्र उत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
नवरात्र काळात देवी दुर्गेच्या विविध रुपांची पूजा केली जाते.
पंचागानुसार, यंदा दुर्गा मातेचे आगमन हत्तीवर बसून होईल विसर्जन
ासाठी म्हैस वाहन असणार आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या आधारावर देवी दुर्गेची सवारी कशी असेल ते ओळखले
जाते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाच्या स्थापनेनंतर दुर्गा देवीचे पहिले रूप शैलपुत्री देवीची पूजा केली जाते.
ज्यांना नवरात्रीचे 9 दिवस उपवास करता येत नाहीत, ते पहिल्या दिवशी आणि दुर्गा अष्टमीला उपवास करतात.
दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही