पावसाळ्याच्या दिवसात डासांचे प्रमाण वाढते. डास चावल्याने डेंग्यू, मलेरिया तसेच व्हायरल ताप यांसारखे आजार होतात.
काही व्यक्तींना इतरांच्या तुलनेत जास्त डास चावतात तेव्हा यामागचं कारण जाणून घेऊयात.
डास अधिकतर अशा लोकांवर बसतात ज्यांच्या शरीराचं तापमान हे जास्त असतं.
शरीराला येणाऱ्या घामाच्या वासाकडे डास आकर्षित होतात. जर तुम्ही शरीर स्वच्छ ठेवलं तर डास तुम्हाला चावणार नाहीत.
कार्बन डाईऑक्साईडचा वास देखील डासांना आकर्षित करते. मादा डास त्यांच्या सेंसिंग ऑर्गनने कार्बन डाईऑक्साईडच्या वासाकडे आकर्षित होतात.
यूरिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड आणि अमोनियाचा वास डासांना आकर्षित करतो.
बियर पिणाऱ्या लोकांकडे डास जास्त आकर्षित होतात असे म्हंटले जाते.
बियर प्यायल्यावर लोकांच्या शरीरातून इथेनॉलचा वास येऊ लागतो. या वासाकडे डास जास्त आकर्षित होतात.
रिपोर्ट्सनुसार ज्यांचं ब्लड ग्रुप o असतो, अशा लोकांकडे डास जास्त आकर्षित होतात.
ब्लड ग्रुप o असलेल्या लोकांना डास जास्त चावतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)