दह्यासोबत साखर की मीठ काय खावं?
दही हे अत्यंत शक्तिशाली नैसर्गिक प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक आहे.
दह्याचे अनेक आयुर्वेदीक फायदे देखील आहेत.
पोट खराब झालं तरी देखील दही किंवा ताक खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण हे पचण्यासाठी हलकं आहे.
शिवाय अनेक खाद्यपदार्थांसोबत देखील दही खालं जातं, यामुळे पदार्थाची चव वाढते.
पण अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे की दही कशासोबत खावं? साखर की मीठ कशासोबत खाल्याने चांगला फायदा मिळेल?
शरीरात जास्त उष्णता, आम्लपित्त आणि केसगळती होणाऱ्या लोकांना गोड दही खाण्याचा सल्ला दिला जातो. हे शरीराला थंड ठेवते.
अपचनाचा त्रास सहन करत असलेल्या व्यक्तींना खारट दही खाण्याचा सल्ला दिला जातो कारण ते पूर्ण पचन सुधारते.
जर तुम्हाला गोड काहीतरी हवे असेल तर साखरेच्या ऐवजी थोडेसे गूळ वापरा.