रितेश देशमुखच्या घरचा Bigg Boss कोण?

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक असलेला रितेश देशमुख यंदा बिगबॉस मराठीच्या सीझन 5 चं सूत्रसंचालन करणार आहे.

बिगबॉस मराठीच्या नव्या पर्वाला 28 जुलै पासून सुरुवात होणार असून त्यासाठी प्रेक्षक उत्साहित आहेत.

यंदाच्या सिझनची थीम हटके असून 'कल्ला तर होणारच' असं रितेश प्रोमोमध्ये म्हणताना दिसतोय.

22 जुलै रोजी बिगबॉस मराठीची पहिली पत्रकार परिषद पार पडली.

यावेळी रितेश देशमुखला पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले.

रितेश देशमुखला तुमच्या घरातील बिगबॉस कोण असा प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी रितेशने अजिबात वेळ न दवडता 'बायको' अस उत्तर दिलं.

रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूझा हे दोघे चित्रपटसृष्टीतील लाडकं कपल आहे.

रितेश आणि जिनिलिया मधील केमेस्ट्री सर्वांनाच आवडते.

2023 मध्ये रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपटात जिनिलियाने प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं.

यापूर्वी जिनिलियाने हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड अशा विविध भाषिक चित्रपटात काम केलं होत.