भारताच्या 5 विकेट्स  घेणारा डुनिथ वेल्लालागे  कोण आहे?

श्रीलंकेच्या कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात सुपर 4 स्टेजचा सामना खेळवला जात आहे.

सामन्यात श्रीलंकेचा युवा गोलंदाज डुनिथ वेल्लालागेने भारताच्या तब्बल 5 विकेट्स घेतल्या. 

डुनिथने विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल, ईशान किशन यांच्या विकेट्स घेतल्या.

डुनिथ वेल्लालागे हा श्रीलंकेचा 20 वर्षीय गोलंदाज असून त्याने आतपर्यंत 13 वनडे आणि 1 टेस्ट मॅच खेळली आहे.

 तर वनडे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यांने 18 विकेट घेतले असून 145 धावा केल्या आहेत.

डुनिथ वेल्लालागे हा 2022 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेचा कर्णधार होता.

 अंडर 19 वर्ल्ड कप २०२२ मध्ये डुनिथने सर्वाधिक 17 विकेट्स घेऊन प्लेयर ऑफ द मॅचचा खिताब पटकावला. 

साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध डुनिथ वेल्लालागेने 113 धावा केल्या होत्या यावेळी तो अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकणारा पहिला श्रीलंकेचा कर्णधार ठरला होता.

डुनिथ वेल्लालागेने भेदक गोलंदाजी करून भारतीय फलंदाजांच्या विकेट्स घेतल्याने सध्या त्याच्या नावाची बरीच चर्चा रंगली आहे.