कोण आहे सौरभ नेत्रावळकर?

टी 20 वर्ल्ड कप २०२४ मधील ग्रुप स्टेज सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करून इतिहास रचला.

या सामन्यात अमेरिकेच्या टीमकडून खेळणारा मुंबईचा सौरभ नेत्रावळकर हा गेमचेंजर ठरला.

32 वर्षीय सौरभने सुपर ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आणि पाकिस्तानला विजयासाठी अपेक्षित असलेल्या 19 धावा होऊ दिल्या नाहीत.

डावखुरा मध्यमगती गोलंदाज सौरभचा जन्म 1991 मध्ये मुंबईत झाला. 2008-09 कूचबिहार ट्रॉफीमध्ये त्याने सहा सामन्यांत 30 विकेट घेतल्या.

सौरभवची 2010 च्या अंडर-19 विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली.

न्यूझीलंडमध्ये झालेल्या 2010 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत केएल राहुल, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांच्यासह सौरभ टीम इंडियाचा भाग होता.

2010 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सौरभने सहा सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. 25 धावांत तीन विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

सौरभशिवाय इतर तीन खेळाडूंनी सिनियर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं, पण सौरभला मुकावं लागलं.

रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीसह इतर भारतीय देशांतर्गत स्पर्धांमध्येही भाग घेतला.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा