कोण होता शरद मोहोळ? का झाली त्याची हत्या?

पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे.

मोहोळ राहत असलेल्या कोथरूडच्या सुतारदरा परिसरात सव्वा एक वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या यात त्याचा मृत्यू झाला.

तेव्हा गँगस्टर शरद मोहोळ नेमका कोण होता आणि त्याला का मारलं हे जाणून घेऊयात.

शरद मोहोळ हा मोहोळ टोळीचा म्होरक्या संदीप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ होता.

2007 साली संदीप मोहोळचा गणेश मारणे टोळीने खून केला, यावेळी शरद मोहोळ संदीपची गाडी चालवत होता.

भावाच्या हत्येनंतर शरद मोहोळने गणेश मारणे टोळी संपवण्याची शपथ घेतली होती.

2010 साली शरद मोहोळने गणेश मारणे टोळीचा म्होरक्या किशोर मारणेचा निलायम टॉकीजजवळ खून केला. लवळेगावचा सरपंचाचं किडनॅपिंग आणि रॉबरीमध्ये शरद मोहोळ प्रमुख आरोपी होता.

2012 साली जर्मन बेकरी ब्लास्टचा आरोपी महम्मद कातील सिद्दीकीची जेलमध्ये बर्मुडाच्या नाडीने गळा आवळून हत्या करण्यात आली, याचा आरोपही शरद मोहोळवर झाला. पण न्यायालयाने त्याची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली.

शरद मोहोळची हत्या त्याच्या गुन्हेगारी वैमनस्यामधून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा