चक्रीवादळाला नावं कोण आणि कसं देतं?

बंगालच्या उपसागरातून आलेल्या  मिचॉन्ग चक्रीवादळाने भारतात हाहाकार माजवला आहे.

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकलं असून तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसलाय.

जागतिक मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन (ESCAP), 13-राष्ट्रीय संस्था, जगभरात चक्रीवादळांना नाव देतात.  

WMO आणि ESCAP मध्ये समाविष्ट 13 देशांमध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन यांचा समावेश आहे.

प्रत्येक देश वादळाला नाव देतो. आठ अक्षरांपेक्षा जास्त हे नाव असू नये अशी एक नियमावली देखील तयार करण्यात आली आहे.

वादळाचे नाव कोणत्याही देशाचा अपमान करणारे नसावं असंही यामध्ये म्हटलं आहे.  

 एखाद्या वादळाला नाव दिल्यावर ते  नाव पुन्हा कोणत्या वादळासाठी वापरता येत नाही.

भारतीय किनारपट्टीवर धडकलेल्या मिचॉन्ग या वादळाचे नाव म्यानमारने दिलं आहे.

मिचॉन्ग हा म्यानमार भाषेतील शब्द आहे. ज्याचा अर्थ ताकद आणि लवचिकता असा होतो.