12M किंवा 36M ब्यूटी प्रोडक्टवर हे का लिहिलं जातं?
ब्युटी प्रोडक्ट्सवर अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात.
त्यांपैकी काही गोष्टी तर आपल्याला माहिती देखील नसतात आणि काही लोक तर त्याबद्दल जाणून घेत नाही.
पण खरंतर त्यात असलेली रसायने बारकाईने तपासणे गरजेचं आहे.
काही स्किन कॉन्शिअस लोक या गोष्टींची नक्कीच स्वत:जवळ माहिती ठेवतात.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल काही ब्युटी प्रोडक्ट्सवर 12M किंवा 36M लिहिलेलं असतं.
हे का लिहिलं जातं आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे माहितीय का?
खरंतर 12M किंवा 36M चा अर्थ हा त्या प्रोडक्टची एक्सपायरी डेट दर्शवतो, पण हे थोडं वेगळं आहे.
उत्पादन उघडल्यानंतरची त्याची एक्सपायरी डेट हा अंक दर्शवतो.
म्हणजेच, उत्पादनावर 12M लिहिले असल्यास. तर याचा अर्थ. ते उघडल्यानंतर फक्त 12 महिने वापरता येतो.