हायवेवर हिरव्या रंगाचे बोर्ड का लावतात?
हायवेवरुन जाताना तुम्ही कधी एक गोष्टीकडे लक्ष दिलंय का? हायवेवर असणाऱ्या पाट्या हिरव्या रंगाच्या असतात.
कोणत्याही हायवेवर असणाऱ्या या साईनबोर्डला हिरवाच रंग का असतो? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय?
प्रवास करताना तुम्हाला हिरव्या रंगाचे बोर्ड, पाट्या लागल्याच असतील. त्यावर पांढऱ्या रंगाने लिहिलेलं असतं.
अशा पाट्यांवर सेफ्टीविषयी आणि पुढील येणाऱ्या ठिकाणांविषयी माहिती दिलेली असते.
मात्र हिरव्याच रंगाच्या पाट्या का? यामागे काय कारण आहे?
हायवेवर थोडंसंही नियंत्रण सुटलं किंवा लक्ष भरकटलं तरी मोठे अपघात होऊ शकतात.
हिरवा रंग आणि त्यावरील पांढऱ्या रंगाने लिहिणं हे शांतीदायक असतात.
हिरवा रंग पाहून कोणाचं लक्ष भरकटणार नाही आणि शांत वाटेल.
हिरवा रंग कुठल्याही वातावरणाशी मिळून मिसळून जातो. कोणाला त्रास होत नाही. त्यामुळे हा रंग हायवेवर असणाऱ्या पाट्यांना दिला जातो.