ऊसाच्या रसाच्या मशीनला घुंगरु का बांधले जातात?

उन्हाळा आला की पावलं आपोआप रसवंती गृहांकडे वळू लागतात.

उन्हात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी अनेकजण ऊसाचा ताजा रस पिण्यास प्राधान्य देतात.

रसवंती गृहांमध्ये गेल्यावर ऊसाचा रस काढणाऱ्या मशीनमधून येणारा छुमछुम असा आवाज तुम्ही ऐकला असेल.

हा आवाज मशीनच्या चरख्यावर बांधलेल्या घुंगरूंमधून येत असतो.  

पण अनेकदा प्रश्न पडतो की ऊसाच्या रसाच्या मशीनला घुंगरु का बांधले जातात?

पूर्वी बैलांच्या सहाय्याने फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढला जायचा.

पुढे काळानुरुप बैल गेले अन् त्याजी लोखंडी मशीन्स आले.

पण या बैलांनी आपल्याला एकेकाळी आपल्याला रसवंतीच्या माध्यमातून जगवलेलं याची आठवण या रसवंती चालकांच्या मनात असते.

बैलाच्या गळ्यातल घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीनच्या चरख्यावर छुमछुम आवाज करत असतं.

बातमी वाचण्यासाठी हेडींगवर क्लिक करा