पक्षी  झाडावर झोपतात, मग खाली पडत का नाहीत?

जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. यापैकी पक्षी एक आहेत. 

पक्षी आश्चर्यकारक दैनंदिन जीवन जगतात.

पक्षांची मेहनत ही आपल्या घरट्यासाठी आणि आपलं पोट भरण्यासाठी असते.

अनेक पक्षी तर झाडाच्या फांद्यांवर उभे राहूनच झोपतात. हे कसं शक्य आहे?

पक्षी झोपताना पडत का नाहीत? असा प्रश्न यामुळे उपस्थीत होतो.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पक्षी जेव्हा झोपतात तेव्हा त्यांचा एक डोळा उघडा राहतो.

यामुळे झोपेत असताना त्यांच्या मेंदूचा एक भाग सक्रिय राहतो.

झाडांच्या फांद्यांवर बसलेले असताना पक्षी त्यांना खूप वेगाने पकडतात.

यामुळे झोपताना ते झाडावरून खाली पडत नाहीत.