Chicken Pox ला भारतात माता का म्हणतात? रंजक आहे कारण

चिकन पॉक्स हा संसर्गजन्य रोग आहे. हा व्हेरिसेला झोस्टर विषाणूद्वारे पसरतो. 

चिकन पॉक्समध्ये शरीरावर लाल पुरळ उठतात. 

चेचक शीतला मातेशी संबंधीत आहे. शीतला मातेला दुर्गेचं रुप मानलं जातं. 

रोग दूर करणारी देवी म्हणून तिला ओळखलं जातं. 

शीतला मातेच्या एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात पवित्र पाण्याचे भांडे आहे.

ती झाडूने माणसांवर रोग पसरवते आणि पवित्र पाण्याने त्यांचा नाश करते. 

शास्त्रानुसार ज्वारासूर नावाचा राक्षस होता जो लहान मुलांना ताप देत असे.

त्यानंतर माता कात्यायनी शीतला मातेचं रुप धारण करुन मुलांच्या शरीरात शिरली. 

शरीरात जाताच अंगावर पुरळ उठले आणि त्यानं मुलांना आतून बरं केलं, अशी मान्यता आहे.