लग्नानंतर फिरायला जाण्याला Honeymoon असं का म्हंटलं जात?
लग्नानंतर बहुतेक सर्व जोडपी आवडत्या ठिकाणी फिरायला जातात.
ट्रिप मागचा उद्देश नव जोडप्याला एकमेकांसोबत काही दिवस घालवायला मिळतील असा असतो.
परंतु या ट्रिपला हनीमून असं का म्हणतात हे जाणून घ्या.
अचानक हार्ट अटॅक आल्यावर सर्वप्रथम करा 'हे' काम, प्रथमोपचाराने वाचवा रुग्णाचे प्राण
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
हनीमून हा इंग्रजी शब्द असून हनी म्हणजेच 'मध' आणि मून म्हणजेच 'चंद्र' या दोन शब्दांपासून तयार झाला आहे.
हनीमून या शब्दातील 'हनी' चा अर्थ म्हणजे लग्नातील मधुरता आणि आनंद. लग्नानंतर लगेच मिळणाऱ्या आनंदाला या शब्दाशी जोडण्यात आलं आहे.
याशिवाय युरोपात लग्नामध्ये नवीन जोडप्याला मध आणि पाण्यापासून तयार झालेले अल्कोहोल ड्रिंक दिल जात.
लग्न आणि लग्नानंतर आनंद देणाऱ्या काळाला हनीमून पिरियड असं म्हंटल जात.
फ़्रेंचमध्ये हनीमूनला 'la lune de miel' असं म्हंटल जात. 19 व्या शतकात हनीमून या शब्दाचा जास्त वापर होऊ लागला.
प्रत्येक देशांच्या संस्कृतीमध्ये हनीमून पिरियड साजरा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत.
लग्नात पाठवणीच्या वेळी नव्या नवरीला देऊ नका 'या' वस्तू
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा