हिवाळ्यात ओठ का फाटतात?

हिवाळ्यात ओठ का फाटतात?

हिवाळ्यात अनेकांना ओठ कोरडे होणे फाटणे अशा समस्या जाणवतात.

परंतु तुम्ही कधी विचार केलाय का? की हिवाळ्यात ओठ फाटण्याची समस्या जास्त का जाणवते?

हिवाळ्यात वातावरणातील आद्रतेचे प्रमाण कमी झाल्याने ओठ कोरडे होण्याची प्रक्रिया सुरु होते

माणसांच्या शरीरात ओठांची त्वचा ही सर्वात नाजूक आणि पातळ असते.

ओठ ही अशी जागा असते की जिथे रोमछिद्र नसतात आणि तेथून घाम देखील बाहेर पडत नाही.

तसेच हिवाळ्यात कमी पाणी प्यायले जाते त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता झाली की ओठ कोरडे होऊ लागतात.

ओठ फाटण्याची समस्येला पाण्याची कमतरता, कोरडे हवामान किंवा व्हिटॅमिनची कमतरता इत्यादी कारणीभूत ठरते.

शरीरात व्हिटॅमिन बी 12, बी 6, बी 9 ची कमतरता असल्यावर देखील ओठ कोरडे होतात.

तेव्हा जर तुम्हाला हिवाळाच नाही तर इतर ऋतूंमध्ये देखील ओठ फाटण्याचा खूप त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर किल्क करा