दारू पिताना 'चिअर्स' का करतात?
अनेकदा दारू पित असताना तुम्ही पाहिलं असेल की लोक एकमेकांवर ग्लास आदळून चिअर्स असे म्हणतात.
पण कधी विचार केलाय की दारू पिताना चिअर्स असं का म्हणतात?
तर आज या मागचे शास्त्र जाणून घेऊयात.
चिअर्स करताना ग्लास एकमेकांवर आदळल्याने, त्या वातावरणातून वाईट आत्मे दूर होतात अशीही मान्यता आहे.
एका यूट्यूब चॅनेलचे संस्थापक संजय घोष यांनी दारू पिण्यापूर्वी 'चीअर्स' करण्याच्या प्रक्रियेबद्दल एक अतिशय मनोरंजक गोष्ट सांगितली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, "दारु पिताना माणसे त्यांच्या पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर करतात".
जेव्हा लोक दारू पिण्यासाठी हातात ग्लास उचलतात तेव्हा ते प्रथम त्याला स्पर्श करतात.
या दरम्यान, त्या पेयाकडे डोळ्यांनी पाहतात. पीत असताना त्या पेयाची चव जिभेने अनुभवतात. या दरम्यान त्या पेयाचा सुगंध नाकाने अनुभवातात."
घोष यांच्या मते, दारू पिण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेत फक्त कानाचा वापर केला जात नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी, 'चिअर्स' केला जातो.
अशा प्रकारे दारू पिण्यात पाच इंद्रियांचा पुरेपूर उपयोग होतो आणि दारू पिण्याची अनुभूती अधिक आनंददायी होते, असे म्हटलं जाते.