विमान लॅंडिंग करताना पायलट बाहेरचं तापमान का सांगतात? 

जेव्हा विमान लॅंड होत असतं तेव्हा वैमानिक बाहेरील तापमानाची माहिती देतात. 

पायलट बाहेरचं तापमान का सांगतात? याचा तुम्ही कधी विचार केलाय का?

प्रवाशांना बाहेरचं तापमान जाणून घेणं किती गरजेचं असतं जाणून घेऊया. 

विमान उतरवण्यापूर्वी पायलटचा हवामान कक्षाकडून माहिती दिली जाते.

विमान उतरवण्यासाठी वाऱ्याचा वेग किती आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. 

बाहेर किती ओलावा आहे, कोणत्या दिशेनं वारं आहे वाहतंय, सूर्यप्रकाश आहे का याचा अंदाज येतो. 

पायलट ही माहिती प्रवाशांना शेअर करतात. 

प्रवासी बाहेर पडताना त्यांना बाहेरच्या हवामानानुसार स्वतःला तयार करता येतं. 

विमानातून बाहेर पडताना प्रवासी आरोग्याची काळजी घेण्यासाठी तयारी करु शकतात.