क्रिकेटची सुरुवात 18 व्या शतकापासून झाली. त्यावेळी जे कपडे सहज मिळायचे ते वापरले जायचे.
त्याच वेळी पांढरे कपडे वापरायला सुरुवात केली.
क्रिकेट हा उन्हाळी खेळ होता.
कसोटी सामना 5 दिवस खेळवला जात होता.
पांढऱ्या रंगाचे कपडे यासाठी निवडले जेणेकरुन उन्हाळ्यात उन्हाच्या झळा परावर्तित करता येतील.
कमी उष्णतेमुळे खेळांडूंचा तणाव कमी होईल हाही त्यामागचा हेतू होता.
कमी थकल्यावर खेळाडू अधिक काळ मैदानात टिकू शकतो.
तेव्हा ब्रिटिश लोक पांढरा रंग राजेशाही आणि अभिजातपणाचे प्रतीक मानत.
क्रिकेटला सज्जनांचा खेळ म्हटलं जायचं आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घातले जायचे.