शिंक येताच डोळे का होतात बंद? काय आहे कारण?
शिंका येणं ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे; मात्र शिंकताना नेहमी आपले डोळे बंद होतात.
शिंकताना नेहमी आपले डोळे बंद का होतात, याचा कधी विचार केलाय? त्यामागे शरीरातलं एक रहस्य आहे.
नाकात एखादा जिवाणू, विषाणू किंवा एखादा बारीक कण गेला, तरी तो बाहेर काढण्यासाठी शिंक येते.
शिंका कशाहीमुळे आल्या, तरी डोळे मात्र बंद होतातच.
शिंकताना डोळे उघडे ठेवायचा प्रयत्न केल्यास डोळ्यातली बुबुळं बाहेर येऊ शकतात, असा समज आहे. मात्र तसं काहीही होत नाही.
शिंकताना आपलं शरीर प्रतिक्षिप्त क्रिया (Autonomic Reflex) करून डोळे बंद करून घेतं.
शिंकताना तोंडावाटे निघणारे जिवाणू डोळ्यांमध्ये जाऊ नयेत, यासाठी आपोआप डोळे मिटले जातात, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
ही प्रतिक्षिप्त क्रिया असल्यानं त्यात काही चुकीचं नसतं. तुम्हाला हवं तर तुम्ही शिंकताना डोळे उघडेही ठेवू शकता.