ऑपरेशन करताना डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात?

तुम्ही जर डॉक्टरांना पाहिलं असेल तर ते नेहमी पांढऱ्या रंगाचा कोट परिधान करतात.

परंतु जेव्हा ते ऑपरेशन करण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्या कपड्यांचा रंग हिरवा किंवा निळा असतो. 

तेव्हा यामागील नेमकं कारण काय आहे? हे जाणून घ्या. 

बऱ्याच वर्षांपूर्वी डॉक्टर ऑपरेशन करताना पांढऱ्या रंगाचे कपडे घालत असत. परंतु नंतर एका मोठ्या कारणामुळे कपड्यांच्या रंगात बदल करण्यात आला. 

डॉक्टरांना ऑपरेशन करताना बराचवेळ ऑपरेशन थिएटरमध्ये रहावे लागते. यावेळी त्यांना रुग्णांचे रक्त पहावे लागते. 

लाल रक्त पाहिल्यानंतर डॉक्टरांनी सफेद कपडे घातलेल्या कर्मचाऱ्याला पाहिले तर त्यांना हिरवा रंग दिसू लागतो. 

रंगभ्रम होणाऱ्या या घटनेला व्हिज्युअल इल्युजन असे म्हणतात. यामुळे डॉक्टरांना सतत हिरवा रंग दिसल्याचा भ्रम होतो. 

यामुळे डॉक्टरांचे लक्ष ऑपरेशन वरून विचलित होऊ शकते. 

निळ्या आणि हिरव्या रंगामुळे डॉक्टरांच्या डोळ्यांना देखील आराम मिळतो.

तज्ञांच्या मते हिरवा किंवा निळा रंग मनाला शांतता देतो आणि एकाग्रता वाढवतो.