हॉस्पिटलमध्ये निळा किंवा हिरव्या रंगाचे कपडे का घालतात डॉक्टर?

बहुतांश वेळा डॉक्टरांना तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घालताना पाहिलं असेल. पांढरा रंग स्वच्छता आणि शांतता दर्शवतो.

त्यामुळे रुग्णालयांच्या भिंती, डॉक्टरांचे कोट, चादरी, उशा यांचाही रंग पांढरा असतो.

जेणेकरून रुग्णाला तेथील स्वच्छ वातावरणाचा अनुभव येतो.

सुरुवातीला डॉक्टरांचे कपडे हे पांढऱ्या रंगाचेच असायचे.

परंतु 1900 च्या दशकाच्या सुरुवातीस, डॉक्टरांना पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचे धोके समजले.

रक्ताच्या गडद लाल रंगाकडे सतत पाहिल्यानंतर, लगेच पांढऱ्या ड्रेसकडे पाहिलं तर....

काही क्षण डोळे चमकतात.

याच कारणामुळे कालांतराने डॉक्टरांनी हिरव्या आणि निळ्या रंगाचे स्क्रब घालण्यास सुरुवात केली.

यामुळे फायदा असा झाला की लाल रंगावरून नजर फिरवून हिरवा किंवा निळा रंग पाहिल्याने डोळ्यांना आराम मिळतो.