गाड्यांमागे का धावतात कुत्रे?
कुत्र्यांची वास घेण्याची आणि शिकण्याची क्षमता त्यांना अद्भुत प्राणी बनवते.
ते माणसांचे मित्र असतात, तरीही कधीकधी त्यांचं वागणं थोडं आश्चर्यचकीत करणारं असतं.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुत्रे धावत असलेल्या वस्तूंच्या मागे धावतात.
अनेकांना त्यांच्या पाळीव कुत्र्यांनी वाहनांच्या मागे धावणे थांबवावे असे वाटते.
परंतु पाठलाग हा कुत्र्याच्या वर्तनाचा एक महत्त्वाचा भाग आहे असं तज्ज्ञांचं मत असल्याचं सांगितलं जातं.
कुत्र्यांचा पाठलाग करून पकडण्याच्या सवयीला शिकारी वर्तन म्हणतात.
जेव्हा कोणतीही गोष्ट त्यांच्या जवळून वेगाने जाते तेव्हा हे वर्तन सक्रिय होते.
कुत्र्यांमध्ये ही एक प्रकारची असुरक्षिततेची भावना आहे, ज्यामुळे ते असे करू लागतात.
त्यांना वाटते की एखादी धावणारी वस्तू त्यांच्यावर किंवा मालकावर हल्ला करत आहे.