खरंच कंन्डोम ठेवायला असतो का जीन्समधील 'हा' खिसा?

 जीन्समध्ये पुढे दोन आणि मागे दोन असे खिसे असतात. 

पुढच्या खिशामध्ये आणखी एक अगदी लहान खिसा असतो.

ज्यामध्ये कोणतीच गोष्ट राहू शकत नाही. मग तो खिसा कशासाठी असतो?

काही लोकांचा असा देखील समज आहे की तो कंन्डोम ठेवण्यासाठी बनवण्यात आला आहे. कारण त्याचा आकार तेवढाच आहे. पण तसं नाही.

जीन्सच्या खिशाच्या आत बनवलेले हे छोटे खिसे एका खास कारणासाठी बनवले गेले आहेत.

1890 मध्ये लेवी जीन्स काउबॉयमध्ये खूप प्रसिद्ध होती.

घोडेस्वारी करताना ते आपले घड्याळ या खिशातच ठेवायचे.

या घड्याळांना एक साखळी जोडलेली होती जी त्यांच्या कमरेला बांधलेली जायची.

आता घड्याळाचा वापर फारसा होत नसला तरी जीन्समधील हे खिसे अजूनही तसेच आहेत.