बॉलपेनमध्ये बॉल कुठे असतो? पेनाला हे नाव का पडलं?

शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये पेनाबाबत नेहमीच चर्चा होते.

कधी विचार केलाय का की पेनचं नाव बॉल पेन कुठून किंवा कसं पडलं?

आम्ही ज्या बॉलपेनबद्दल बोलत आहोत, त्याला 85 वर्ष आधी हंगरीमधील लैस्जलों बिरोने बनवलं होतं.

लैस्जलों बिरो याने आपला भाऊ जॉर्ज बिरोसोबत बॉलपेन बनवायला तयार केलं. ज्यामुळे या पेनला बिरो पेन देखील म्हणतात.

प्रेशराइज ट्यूब आणि कॅपलरी एक्शनच्या मदतीने शाई लिक थांबवण्यासाठी एक सिस्टम तयार केली.

नीट पाहिलं तर लक्षात येईल की, पेनच्या टोकावर एक लहान बॉल लावलेला असतो.

जसा जसा पेन कागदावर चालतो, तसा हा लहान बॉल कार्टेजमधून शाई घेतो आणि कागदावर खाली सोडतो.

जेव्हा हा पेन तयार नव्हता, त्यापूर्वीच्या पेनमधील शाई लिक व्हायची, ज्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं.

पण या पेननं सगळ्या गोष्टी सोप्या केल्या. ज्यानंतर या दोन्ही भावांना रॉयल एयर फोर्सकडून 30 हजार पेनांची ऑर्डर मिळाली.