पंखा फिरताच हवा का लागते, कधी विचार केलाय?
उन्हाळ्यात आपण पंखा चालवतो तेव्हा त्याच्या वाऱ्यामुळे आपल्याला थंड वाटतं.
परंतू पंखा बंद करताच अचानक उकाडा जाणवू लागतो.
पण कधी विचार केलाय का की पंखा कसा काय हवा तयार करतो?
छताचे पंखे खोलीत हवा फिरवून थंडपणा निर्माण करण्याचे काम करतात.
पंखा चालू केला की त्याचे ब्लेड गोल फिरू लागतात.
असे केल्याने त्याच्या खाली कमी दाबाचे क्षेत्र तयार होते.
जिथे हवेचा दाब कमी असतो तिथे खोलीतील इतर ठिकाणाहून हवा आत खेचली जाते.
ही हवा पंख्याच्या ब्लेडशी लढते आणि त्यांच्याशी आदळते आणि निघून जाते.
ही प्रक्रिया चालू राहते आणि त्यामुळे पंखा चालू असल्यामुळे हवा मिळते.