जिभेवर का जमा होतो पांढरा थर? ही असतात कारणं

काही लोकांची जीभ ही लाल किंवा गुलाबी नाही तर पांढऱ्या रंगाची असते.

जिभेवर पांढरा थर जमा होण्याची अनेक कारण असतात.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार जिभेची वित्त स्वच्छता न केल्याने जिभेवर पांढरा थर जमा होतो.

तुम्ही दिवसात पुरेसे पाणी प्यायला नाहीत तरी देखील जिभेवर पांढरा थर जमा होऊ शकतो.

धुम्रपान, सिगरेट, दारू इत्यादींच्या सेवनाने देखील जिभेवर पांढरा थर जमू लागतो.

शरीरात आयरन, व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यास जिभेवर पांढरा थर जमा होतो.

ओरल थ्रशमुळे देखील जिभेवर  पांढरा थर जमा होतो. हे एक प्रकारचे यीस्ट इंफेक्शन असते.

 जिभेवरील पांढरा थर दूर करण्यासाठी तुम्ही टंग क्लिनरने जीभ स्वच्छ करू शकता. तसेच गरम मिठाच्या पाण्याने गुळण्या करू शकता.  

सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा