कुत्रे रात्रीचे का रडतात?
बऱ्याचदा रात्रीच्या वेळी किंवा पहाटे कुत्रे मोठ्याने ओरडताना तुम्ही ऐकलं असेल.
लोक याला कुत्र्याचं रडणं देखील म्हणतात. कुत्र्याचे रडणे हे अनेक लोक अशुभ मानतात.
कुत्रे रडणं म्हणजे काहीतरी वाईट होणार आहे किंवा कुत्र्यांना भूत दिसतं असा देखील अनेकांचा समज आहे. पण हे खरं नाही.
याबाबत एका संशोधनात एक अतिशय मनोरंजक खुलासा झाला आहे. ज्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
शास्त्रत्रांच्यामते कुत्रे फक्त तेव्हाच रडतात जेव्हा त्यांना त्यांच्या बाकीच्या साथीदारांना एखादा संदेश द्यायचा असतो.
एका खास आवाजाद्वारे ते अनेक वेळा त्यांचे स्थान त्यांच्या बाकीच्या साथीदारांना सांगतात जेणेकरून ते त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकतील.
दुसरीकडे, कुत्र्यांना वेदना होत असतानाही ते रडतात किंवा ओरडतात. त्यांची समस्या मांडण्याची ही एक खास पद्धत आहे.
कुत्रा हा असा प्राणी आहे ज्याला माणसांमध्ये मिसळायला आवडते. जेव्हा ते घरी किंवा बाहेर रस्त्यावर असतात तेव्हा त्यांना एकटेपणा जाणवतो. यामुळे ते रडतात.
कुत्र्याला दुखापत झाली किंवा त्याची तब्येत बरी नसली तरी तो रात्री रडायला लागतो.