ट्रेनच्या डब्यावर H1 चा बोर्ड का लावला जातो?
भारतीय रेल्वे ही देशाची लाइफलाइन आहे. रेल्वे रूळांचं जाळ संपूर्ण देशभर पसरलं असून अनेकांनी रेल्वेतून किमान एकदा तरी प्रवास केला असेल.
प्रवासादरम्यान ट्रॅक पासून ते रेल्वेच्या डब्यापर्यंत अनेक निराळ्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतात.
रेल्वेमधील प्रत्येक गोष्ट कोणत्या न कोणत्या कारणाने ठेवलेली असते परंतु प्रवासी त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की रेल्वेच्या एका डब्यावर H1 चा बोर्ड लावलेला असतो.
तेव्हा रेल्वेच्या डब्यावर H1 चा बोर्ड का लावला जातो याविषयी जाणून घेऊयात.
रेल्वेच्या डब्यावर H1 चा बोर्ड हा तो विशिष्ठ डब्बा फर्स्ट क्लासचा आहे हे दर्शवण्यासाठी लावला जातो.
रेल्वेतील फर्स्ट क्लास एसीचा डबा ही रेल्वेतील सर्वात महागडी पण प्रीमियम अनुभव देणारी श्रेणी आहे.
H1 प्रमाणेच थर्ड एसीसाठी B तर चेअर कारसाठी CC अशी अक्षर लिहिलेला बोर्ड लावला जातो.
TTE आणि TC यामध्ये काय फरक असतो?
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा