हार्ट अटॅकने दरवर्षी जगभरात अनेक लोकांचा मृत्यू होतो.
हिवाळ्यात हार्ट अटॅकच्या प्रकरणांमध्ये वाढ होते, तेव्हा यामागचे कारण जाणून घ्या.
हार्ट अटॅक कोणत्याही ऋतूत येऊ शकतो, पण त्याचा धोका हिवाळ्यात जास्त असतो.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वनिता अरोरा यांच्या मते, हिवाळ्यात हवामानातील तापमान कमी होते.
कमी तापमानामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या आकसतात. यामुळे रक्त हळूहळू हृदयापर्यंत पोहोचते.
डॉक्टर सांगतात की, जेव्हा आपल्या हृदयाच्या नसा आकसतात तेव्हा हृदयाला होणारा रक्तपुरवठा मंदावतो आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात. अशा स्थितीत रक्तपुरवठा खंडित होऊन हार्ट अटॅक येतो.
हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी हिवाळ्यात अधिक काळजी घ्यावी. हार्ट अटॅक टाळण्यासाठी योग्य उबदार कपडे घालावेत.
तापमान सर्वात कमी असताना सकाळी आणि रात्री घराबाहेर पडू नये.
बाहेर पडल्यास अंगावर गरम कपडे घालावेत आणि शरीर उबदार ठेवावे तसेच सकस आहार घ्यावा.
हृदय चांगले ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली खूप महत्त्वाच्या असतात.
तेव्हा दररोज 40 मिनिटांत 4 किलोमीटर चालत असाल तर हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.