JCB चा रंग फक्त पिवळाच का असतो?
इमारती आणि बांधकामे पाडण्यासाठी विशेष मशीनचा वापर केला जातो. त्याला जेसीबी म्हणतात.
पिवळ्या रंगाचं हे मशिन इतकं मोठं असतं की ते अल्पावधीतच मोठं बांधकाम पाडू शकतं.
इमारती पाडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दुसऱ्या मशीनला बुलडोझर म्हणतात. रस्ते बांधणीतही याचा वापर होतो.
More
Stories
पिल्लांसाठी पक्षी धोकादायक सापाशीही लढला, जीव गेला मात्र त्यांना वाचवलं!
आयुष्याला कंटाळला असाल तर हा Video नक्की पाहा, परिस्थिती काहीही करायला लावते!
जेसीबी मशिन आणि बुलडोझर पिवळ्या रंगाचे असतात. मात्र यामागे काय कारण आहे?
कधी या मशीनचा रंग दुसरा नसतो.
काही खास कारणं लक्षात घेऊन याचा रंग पिवळा ठेवला आहे.
बांधकामाच्या ठिकाणी लाल, पांढऱ्या रंगाच्या जेसीबी मशीनचे काम सुरू असताना दुरून दिसण्यात अडचण होती.
कंपन्यांनी जेसीबीचा रंग बदलून पिवळा केला, कारण ते दुरूनच दिसतील. पिवळ्या रंगामुळे ते रात्रीही सहज दिसतात.
जेसीबी हे या मशीनचे खरं नाव नाही. जेसीबी असं हे मशीन बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे.
जोसेफ सिरिल बॅमफोर्ड एक्स्कॅव्हेटर्स लिमिटेड ही कंपनी जोसेफ सिरिल बॅमफोर्ड यांनी 1945 मध्ये स्थापन केली होती.
आपण ज्याला जेसीबी मशीन म्हणतो, त्याचे खरे नाव 'बॅकहो लोडर' आहे.