तुम्ही अनेकदा विमान पाहिलं असेल यानं प्रवास केला असेल. प्रत्येक विमानाचा रंग पांढराच असतो.
तुम्ही कधी विचार केलाय का विमानाचा रंग नेहमी पांढराच का असतो?
विमान पांढरे ठेवण्याचे शास्त्रीय कारण काय. याविषयी जाणून घेऊया.
विमानाचा रंग पांढरा ठेवल्याने कंपनीचे लाखो रुपयांची बचत होते आणि इतर अनेक फायदेही मिळतात.
विमान पांढरे ठेवण्यामागे दिलेले वैज्ञानिक कारण म्हणजे पांढरा रंग उष्णता कमीत कमी शोषून घेतो.
तज्ज्ञ सांगतात, विमान पांढऱ्या रंगाऐवजी इतर कोणत्याही रंगात रंगवले असेल तर ते उष्णता जलद शोषून घेते आणि विमान लवकर गरम होते.
पांढऱ्या रंगाचे विमान इतर रंगांपेक्षा कमी गरम होते.
विमान रंगवण्यासाठी 50 हजार ते 2 लाख डॉलरपर्यंत खर्च येतो. पांढऱ्या रंगामुळे तो खर्च कमी होतो.
विमान इतर रंगाने रंगवले तर त्यावरचे ओरखडे लवकर दिसू लागतील.
पांढऱ्या रंगात किंवा स्क्रॅचेस लवकर दिसत नाहीत.