हळद लागल्यावर वधू वराला एकटं का सोडत नाहीत?

सध्या लग्नाचे अनेक शुभ मुहूर्त असल्याने बरीच जोडपी सध्या लग्नबंधनात अडकत आहेत.

हिंदू धर्माच्या परंपरेनुसार विवाह करत असताना अनेक प्रथा परंपरा पाळाव्या लागतात.

अशातच एक प्रथा म्हणजे नवं वर-वधूला हळद लागल्यावर एकटं न सोडणे. परंतु यामागचं नेमकं कारण जाणून घ्या.

हळदीला एक विशेष प्रकारचा वास असतो त्यामुळे वातावरणातील सर्व प्रकारच्या सकारत्मक आणि नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीकडे वेगाने आकर्षित होतात.

जर एखादी व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत नसेल तर नकारात्मक ऊर्जा व्यक्तीकडे लगेच आकर्षित होतात.

या नकारात्मक ऊर्जेचा व्यक्तीवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्याच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात.

लग्नात हळद लागल्यावर वधू आणि वर दोघे पवित्र होतात. त्यामुळे वाईट शक्ती त्यांच्याकडे लगेच आकर्षित होऊ शकतात असा लोकांचा समज आहे.

पूर्वजांच्या म्हणण्यानुसार लग्नात हळद लावण्यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही.

हळद शरीराचे सौंदर्य वाढवते आणि सर्व प्रकारच्या त्वचा रोग आणि शरीराला येणाऱ्या दुर्गंधी पासून मुक्त करते.

वरील लेख हा केवळ सामान्य माहितीसाठी आहे. याचा  न्यूज 18 मराठीशी कोणताही संबंध नाही.