मासिकपाळी आधी आणि नंतर पिंपल्स का येतात?

पिरिएड्स किंवा मासिकपाळी दरम्यान किंवा नंतर महिलांना पिंपल्स येतात आणि हे अगदी सामान्य आहे. पण हे पिपंल्स कशामुळे येतात हे माहितीय?

हॉर्मोनल्स चेंजेसमुळे बहुतांश मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या दिसून आली आहे.

मासिक पाळी सुरू होण्याच्या काही दिवस आधी मुलींच्या चेहऱ्यावर लहान मुरुम येऊ लागतात.

पण यामागचं कारण फक्त हॉर्मोनल्स बदल नसून आणखीही काही आहेत. चला त्याबद्दल जाणून घेऊ.

यावेळी शरीरात एंड्रोजन नावाचा हार्मोन वाढतो, ज्यामुळे देखील पिंपल्स होऊ शकतात.

मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते, ज्यामुळे त्वचेवर लाल मुरुम दिसू लागतात. 

मासिक पाळीच्या वेळी तणाव वाढू लागतो, यामुळे देखील पिंपल्स होऊ शकतात.

एवढेच नाही तर मासिक पाळी आल्याने महिलांच्या दिनचर्येतही बरेच बदल होतात. त्यामुळे त्या ना नीट जेवू शकत ना  वेळेवर झोपत. त्यामुळे पिंपल्स येण्याची शक्यता आहे.

काही स्त्रिया मासिक पाळी दरम्यान जंक फूड, फास्ट फूड किंवा मद्यपान करतात. ज्यामुळे देखील पिंपल्स येतात.