डाळ शिजवताना का येतो फेस? 99 % लोकांना माहित नाही

प्रत्येक पदार्थ शिजवण्याची ठरावीक पद्धत असते. डाळ, तांदूळ शिजवताना त्यावर पांढरा फेस येतो.  

डाळ शिजवताना येणाऱ्या फेसाचा काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडतो.

कुकरऐवजी एखाद्या उघड्या पातेल्यात डाळ शिजवली जाते, तेव्हा त्यावर येणारा फेस हा सॅपोनिन्सने बनलेला असतो.

एका ऑनलाइन अहवालानुसार, डाळींमध्ये सॅपोनिन्स हे ग्लायकोसाइड्स असतात. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर ते पाण्यात मिसळू लागतात.

सॅपोनिन्समध्ये साबणासारखे गुण असतात. पाण्याला उकळी आल्यानंतर हवा त्यात शिरते आणि त्याचा फेस तयार होतो.

एका सिद्धान्तानुसार, डाळ उकळल्यानंतर त्यात असणारं प्रोटीन निघून जातं. वाफेद्वारे कण बाहेर पडतात आणि पृष्ठभागावर फेस तयार होतो. याला प्रोटीन डिनेच्युरेशन असं म्हटलं जातं.

डाळ धुताना पाण्यावर येणारा फेस हा शरीरासाठी धोकादायक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

डाळीवरचा फेस आधी काढून मग तिचा खाण्यासाठी वापर केला पाहिजे.

डाळ अनेकदा कुकरमध्ये शिजवली जाते; पण तज्ज्ञ असं सांगतात की डाळ कुकरमध्ये न शिजवता उघड्या पातेल्यात शिजवली पाहिजे.

जेणेकरून डाळीला उकळी आल्यानंतर त्या उकळीवर असलेला फेस चमच्यानं जसाच्या तसा काढून घेता येईल.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा