छत्रीचा आकार नेहमी गोल का असतो?

पावसाळ्याच्या दिवसात लोक सर्वात जास्त वापरतात ती छत्री, ही आपल्याला पावसाच्या पाण्यापासून वाचवते.

लहान, मोठी, पॉकेट छत्री अशा वेगवेगळ्या प्रकारची आणि अकाराची छत्री बाजारात उपलब्ध आहे.

पाऊसच नाही तर उन्हापासूनही छत्री आपलं संरक्षण करते.

पण तुम्ही कधी विचार केलाय का की छत्री वेगवेगळ्या प्रकारात येत असली तरी देखील तिचा आकार मात्र गोलच असतो असं का?

छत्रीचा आकार कधी चौकोनी, त्रिकोणी किंवा आयताकृती का नसतो? कधी असा विचार केलाय?

असं नाही की छत्रीला गोल ऐवजी चौकोनी छत्री बनवण्याचा विचार केला गेला नाही, परंतु चौकोनी छत्री गोल छत्री इतके संरक्षण देत नाही.

खरं तर, एक गोलाकार छत्री सर्व बाजूंनी पाणी अडवते.

तर छत्री चौकोनी असल्यास, ते रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना देखील त्रास देते आणि ते ओले होण्यापासून संरक्षण देत नाही.

शिवाय चौकोनी छत्री ठेवणे अवघड असते, त्यामुळे छत्री गोलाकार ठेवली जाते. कारण तिला बंद करणं ही कठीण असतं.