लग्नात नववधूला उलटं मंगळसुत्र का घालतात?
हिंदू लग्नांमध्ये मंगळसुत्राला खूप महत्व आहे. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लग्नात स्त्रीयांना उलटं मंगळसुत्र घातलं जातं.
ही लग्नातील एक प्रथा आहे, ज्याला सगळे लोक पाळतात. पण असं का करतात?
यामागचं कारण जर विचारलं तर क्वचितच कोणालातरी सांगता येईल. आज आम्ही याच प्रथेबद्दल सविस्तर बोलणार आहोत.
या मंगळसुत्रामधील वाट्या जेव्हा महिलेच्या हृदयाजवळ येतात तेव्हा ते तिच्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या उत्तम ठरतात. यामागे कारण आहे धातूच्या वाट्या.
सोन्याच्या धातूने बनलेल्या मंगळसुत्रामधील वाट्या या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे आणि याच कारणामुळे नववधूचं मंगळसुत्र मोठं बनवलं जातं.
मंगळसूत्र हे सोने आणि चांदीने बनविण्यात येते. दोन्ही धातू हे महिलांच्या हृदयाला निरोगी राखण्यास मदत करतात.
या धातूमुळे रक्तदाबदेखील नियंत्रणात राहाते मंगळसूत्रातील काळा मणी हा महिलांना राहू, केतू, शनिच्या दुष्प्रभावापासून वाचवतो.
मंगळ सुत्राच्या दोन्ही वाट्यांमध्ये हळद आणि कुंकू हे सौभ्यागाचे लक्षण भरून हे उलटे घातले जाते.
ज्यामुळे लोकांना कळते की महिला नुकतीच सैभाग्यवती झाली आहे किंवा तिचं नुकतंच लग्न झालं आहे.