लाखोंमध्ये एक असतो पांढरा नाग, असं का?
कोब्रा अनेक रंगात आढळतात पण पांढऱ्या रंगाचे कोब्रा हे खूपच रेअर असतात.
काळ्या किंवा राखाडी रंगाचे किंग कोब्रा सामान्यतः उत्तर भारतात आढळतात.
दक्षिण भारतात आढळणारे कोब्रा सोनेरी किंवा तपकिरी रंगाचे असतात.
मेलॅनिनची कमतरता नागांच्या शुभ्रतेला कारणीभूत आहे.
मेलॅनिन सापांना रंग देतो, त्याच्या कमतरतेमुळे रंग नष्ट होतो.
याला सापाच्या त्वचेचा आजार म्हणता येईल. अशा सापाला अल्बिनो म्हणतात.
अशा सापांना नीट दिसत नाही आणि चालताही येत नाही.
ते थेट सूर्याच्या किरणांमध्ये बाहेर पडणं टाळतात, कारण सुर्याची किरणं ते सहन करु शकत नाहीत.
पण त्यांच्या विषाची तीव्रता सामान्य कोब्राच्या विषासारखीच असते.