महिलांनी साष्टांग नमस्कार का घालू नये? असं आहे यामागचं शास्त्र
हिंदू संस्कृतीत नमस्कार करण्याच्या विविध पद्धती आहेत.
नमस्कारात कायिक, वाचिक आणि मानसकि असे तीन प्रकार आहेत.
कायिक नमस्काराला साष्टांग नमस्कार असे म्हणतात.
तिन्ही नमस्कारात हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. हा नमस्कार करताना हृदय, माथा, पाय, गुढघे आणि हात इत्यादी शरीराचे आठ अंग जमिनीला टेकतात.
साष्टांग नमस्कार हा व्यायामाचा देखील एक प्रकार असून तो मुख्यत्वे सूर्य आणि देवांना घातला जातो.
मात्र महिलांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हंटले जाते.
स्त्रियांचा गर्भ आणि वक्ष जमिनीवर टेकू नये असे यामागचं कारण आहे.
शास्त्रातनुसार जमीन अर्थात भूमी जे कार्य करते तेच कार्य स्त्रिया सुद्धा करतात.
स्त्रिया गर्भातून नवीन जीवाला जन्म देतात आणि वक्षाने त्या जीवाचे पालनपोषण करतात.
म्हणून स्त्रियांनी अष्ट अंगामधील ही दोन्ही अंग जमिनीला टेकवता गुडघ्यावर बसून नमस्कार करावा असं शास्त्र सांगत.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. तुम्ही अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधून माहिती घेऊ शकता. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)