मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. देशभरात मकर संक्रांत हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला काळी साडी आणि हलव्याचे दागिने भेट दिले जातात.
यंदा पुण्यातील बाजारपेठेत काळ्या साडीचे नेमके कुठले कुठले प्रकार आले आहेत हे जाणून घेऊया.
पुण्यातील रविवारपेठ या ठिकाणच्या साड्यांच्या दुकानात संक्रांती निमित्त काळ्या साड्या अगदी कमीतकमी म्हणजेच 400 रुपये इतक्या किमतीत उपलब्ध आहेत.
मकर संक्रांतीला नेसण्यात येणाऱ्या काळ्या रंगाच्या साड्यांसाठी निरनिराळ्या साड्यांचे पर्याय आहेत.
यामध्ये तुम्हाला साड्यांची महाराणी पैठणी, बनारसी साडी, कतान सिल्क, कॉटन सिल्क चंदेरी साडी, कांचीपुरम साडी, मदुराई सिल्क साडी, प्युअर सिल्क टसर साडी उपलब्ध आहे.
यासोबतच टसर सिल्क विथ कांथावर्क, हॅन्डवूव्हन सिल्क साडी आणि डिझानर ब्लाऊज, डिझानर साडी असे अनेक प्रकार बाजारपेठेत उपलब्ध असल्याची माहिती दुकानदार यांनी दिली.