थंडीत कसा असावा आहार?

थंडीत कसा असावा आहार?

सध्या हिवाळा ऋतू सुरू असून हा काळ शरीराला सर्वाधिक मानवणारा मानला जातो. 

जालन्यातील आहार तज्ज्ञ गीता कोल्हे यांनी हिवाळ्यात आहार कसा असावा याविषयी माहिती दिलीय. 

त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी दुग्धजन्य तसेच स्निग्ध पदार्थांचा वापर आहारात करायला हवा. 

दुग्धजन्य पदार्थांमध्ये दूध, तूप, लोणी, दही, ताक इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश असावा. 

हिवाळ्यात पचनक्रिया चांगली असल्याने जास्तीत जास्त पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करावा.

थंडीत सूर्योदयापूर्वी झोपेतून उठून गरम पाणी किंवा पाण्यात लिंबू आणि मध घेणं फायदेशीर ठरतं. 

त्यानंतर कोणताही एक व्यायाम प्रकार करावा. ज्यात धावणे किंवा एरोबिक्स असावे. 

सकाळचा नाश्ता हा राजा सारखा भरपेट करावा. यात कडधान्यांचा समावेश करावा. 

आवश्यकतेनुसार पाणी आणि हंगामी फळांचे सेवन भरपूर प्रमाणात करावं.