हिवाळ्यात तुमचे पायही नेहमी थंड राहतात? असू शकते ही समस्या..

हिवाळ्यात तुमचे पायही नेहमी थंड राहतात? असू शकते ही समस्या..

हिवाळ्यात हात-पाय थंड होणे हे सामान्य आहे.

पण अनेक लोक तक्रार करतात की, त्यांच्या पायाचे तळवे नेहमी थंड असतात.

थंड हवामानात लोक कपड्याच्या अनेक थरांनी अंग झाकतात. यानंतरही तळपाय थंड राहतात. 

जेव्हा पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि रक्त, तळवे आणि पायांपर्यंत पोहोचत नाही तेव्हा ते थंड होऊ लागतात.

जर तुमच्या पायाचे तळवे नेहमीपेक्षा जास्त थंड असतील तर या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही तळवे उबदार ठेवू शकता.

तुमचे पाय कोमट पाण्यात मिठ टाका आणि त्यात पाय बुडवा किंवा उबदार कपड्याने गुंडाळा.

तुमचे तळवे सतत थंड राहिल्यास, तुम्ही त्यांना गरम करण्यासाठी हीटिंग पॅड वापरू शकता.

हात-पायांवर थंडी जास्त वाटत असेल तर रोज व्यायाम करा. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारेल. 

पायात उबदारपणा आणण्यासाठी, कोमट तेलाने तुमच्या पायाची आणि तळव्यांची मालिश करा.

रक्तात लोहाची कमतरता असतानाही पाय थंड आणि बधीर होतात. त्यामुळे तुमच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा वापर करा.