कडाक्याच्या थंडीत वृद्धांनी काय घ्यावी काळजी?

कडाक्याच्या थंडीत वृद्धांनी काय घ्यावी काळजी?

थंडीच्या दिवसांत अनेक आजार डोकं वर काढतात त्यामुळे या काळात वृद्धांनी काळजी घेणं गरजेचं असतं.

विशेषतः वृद्धांना थंडीचा त्रास होतो आणि हृदयरोग किंवा पॅरालिसिस सारखा धोका वाढण्याची शक्यता असते. 

वृद्धांनी थंडीत स्वतःची काळजी कशी घ्यावी? याबद्दल वर्धा येथील डॉक्टर जयंत गांडोळे यांनी माहिती दिलीय.

वृद्धांनी जास्तीत जास्त गरम कपडे, स्वेटर, पाय आणि हातमोजे, टोपीचा वापर करावा. 

अनेकांना मॉर्निंग वॉकची सवय असते. मात्र थंडीच्या दिवसात पहाटे बाहेर पडणे शक्यतो टाळावे.

तीळ, गूळ, सुकामेवा आणि बाजरीची भाकर अशा प्रकारच्या पदार्थांचे सेवन करावे. 

हिवाळ्यामध्ये जेवणापूर्वी व नंतर असणाऱ्या नेहमीच्या औषधी वेळेत घेणं गरजेचं आहे. 

वृद्धांची त्वचा आधीच कोरडी आणि सुरकुत्या पडलेली असते त्यामुळे त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी. 

थंडीत उडीद डाळ खाण्याचे फायदे